मुंबई:तुमचं हसण तुम्हाला अधिक सुंदर बनवते. यामुळे प्रत्येकाला वाटते की हसताना त्यांचे दात(teeth) पांढरेशुभ्र दिसावेत. मात्र अनेकदा असे होत नाही.
दररोज ब्रश केल्यानंतरही लोकांचे दात पिवळे दिसत असतात. तुम्हाला या पिवळेपणाचे कारण माहीत आहे का?
अनेकदा खाण्याच्या-पिण्याच्या सवयी याचे कारण बनतात. मोठ्या प्रमाणात कॉफी अथवा चहाचे सेवन केल्याने दातांचा पिवळेपणा वाढतो.
मोठ्या प्रमाणात सोड्याचे सेवन केल्यानेही दातांवरील वरचा पृष्ठभाग कमी होतो.
तसेच मोठ्या प्रमाणात स्मोकिंग आणि तंबाखू खाल्ल्याने दात पिवळे होऊ लागतात.
याचे मुख्य कारण शरीरातील पोषक तत्वांची कमतरता हे ही असू शकते.