Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीश्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होत असतानाच महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म, नाव ठेवले...

श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होत असतानाच महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म, नाव ठेवले…

मुंबई: मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारीला उत्साहात संपन्न होत असतान मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा रुग्णालयात एका महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. या बाळांचे नाव ठेवण्यात आले राम आणि लक्ष्मण.

२२ जानेवारी म्हणजेच रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा दिवस अनेकांसाठी अविस्मरणीय ठरला. छतरपूर जिल्हा रुग्णालयात ३१ प्रसूती झाल्या. यात २४ नॉर्मल आणि ८ सिझेरियन डिलीव्हरी झाल्यात १९ मुले आणि १३ मुलींनी या दिवशी जन्म घेतला.

या खास निमित्ताने मुले आणि मुलींची नावे राम आणि सीतेवरून ठेवण्यात आली. हॉस्पिटलमध्ये बाळांच्या आवाजाने तेथील कुटुंबीय आणि प्रसूती झालेल्या मातांच्या आनंदाला पारावर उऱला नव्हता.

रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. या मुलांचे नाव राम आणि लक्ष्मण ठेवण्यात आले. आपल्या घरात साक्षात राम आणि लक्ष्मण यांनी जन्म घेतल्याच्या भावना या कुटुंबाने यावेळी व्यक्त केल्या.

मध्य प्रदेशात सर्वाधिक ५००हून अधिक बाळांचा जन्म

मध्य प्रदेशमध्ये या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला एकूण ५०० हून अधिक बाळांचा जन्म झाला. एकट्या राजधानी भोपाळमध्ये १५० हून अधिक डिलीव्हरी झाल्या. याशिवाय ग्वालियारमध्ये ९०, इंदौरमध्ये ३५ आणि शिवपुरीमध्ये ३३ हून अधिक मुलांचा जन्म झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -