
मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शोएब मलिक सातत्याने चर्चेत आहे. नुकताच शोएब आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. यानंतर दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. मात्र शोएब आता नव्या वादात अडकताना दिसत आहेस.
हा वाद मॅच फिक्सिंगवरून आहे. खरंतर, शोएब मलिक यावेळेस बांगलादेश प्रीमियर लीग खेळत आहे. या दरम्यान त्याने मैदानावर असे काही केले की यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियावर शोएब मलिक चांगलाच ट्रोल होत आहे.
3 No Ball in a Row by @realshoaibmalik
RIP PAKISTAN CRICKET 💔#ShoaibMalikMarriage #ShoaibMalik #PakistanCricket #SanaJaved #ad pic.twitter.com/PbjefKGSpd
— Muhammand Naseer (@IamNaseer08) January 22, 2024
शोएब मलिकने पॉवरप्लेमध्ये केली गोलंदाजी
आता चाहत्यांनी मॅच फिक्सिंगबाबत स्पिन ऑलराऊंडर शोएब मलिकविरोधात तपासाची मागणी केली आहे. बीपीएलमध्ये मलिक फॉर्च्यून बरिशल संघाकडून खेळतो याचे नेतृत्व तमिम इक्बालच्या हाती आहे.
बरिशलने पहिल्यांदा बॅटिंग करताना ४ बाद १८७ धावा केल्या होत्या. या दरम्यान मुशफकिर रहीमने ६८ धावांची खेळी केली. जेव्हा खुलना टायगर्स आव्हान परतवण्यासाठी उतरले तेव्हा कर्णधार तमिमने पॉवरप्लेमध्ये शोएब मलिककडून गोलंदाजी करून घेतली. यात तो चांगलाच महागडा ठरला.
एका ओव्हरमध्ये ३ नोबॉल देत दिल्या १८ धावा
४१ वर्षीय शोएब मलिकने डावातील चौथी ओव्हर गोलंदाजी केली. यात त्याने ३ बॉल नोबॉल टाकले. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मलिकने सलग २ नोबॉल फेकले. दुसऱ्यांदा नोबॉलवरही चौकार लगावला. तर अखेरच्या फ्रीहिटवर षटकार बसला. या पद्धतीने मलिकने सामन्यात एक ओव्हर टाकली. यात त्याने १८ धावा दिल्या.
यावरून तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. चाहते मॅच फिक्सिंगवरून तपासाची मागणी करत आहेत. शेवटी खुलना टायगर्सने १८ षटकांत २ विकेट गमावताना सामना जिंकला.