Sunday, March 16, 2025
HomeदेशParliament: संसद सुरक्षेबाबत मोठा निर्णय, सुरक्षेसाठी CISF तैनात

Parliament: संसद सुरक्षेबाबत मोठा निर्णय, सुरक्षेसाठी CISF तैनात

नवी दिल्ली : संसद भवनात भेट देणारे आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) चे जवान तैनात करण्यात आले आहेत. या माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या वर्षी १३ डिसेंबरला संसद कक्षेत काही लोकांनी प्रवेश केल्याप्रकरणी तसेच कलर स्मोक वापरल्याप्रकरणी सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता या तैनातील मंजुरी देण्यात आली आहे.

अधिकृत सूत्रांनी न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनादरम्यान पर्यटक आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी नव्या उपायांतर्गत संसद परिसरात १४० सीआयएसएफ कर्मचाऱ्यांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

संसद परिसरात सांभाळला मोर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीआयएसएफच्या एकूण १४० जवानांनी सोमवारी संसद परिसरात मोर्चा सांभाळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीआयएसएफचे जवान पर्यटक आणि त्यांच्या सामानाची तपासणी करतील. याशिवाय ते अग्नि सुरक्षा कव्हरही प्रदान करतील.

विमानतळाप्रमाणे होणार तपासणी

जवानांची तुकडी संसद भवात आधीपासून उपस्थित असलेल्या सुरक्षा एजन्सीसोबत परिसराचे निरीक्षण करत आहे. यामुळे ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी तयार राहतील. सूत्रांच्या माहितीनुसार सीआयएसएफचे जवान नव्या आणि जुन्या संसद भवनात विमानतळाप्रमाणे कडक सुरक्षा प्रदान करतील.

एक्सरे मशीनने होणार तपासणी

यासोबतच संसद भवनात येणाऱ्या लोकांची तसेच त्यांच्या सामानाची एक्स रे मशीने तसेच हाताने पकडले जाणाऱ्या डिटेक्टरने तपासणी केली जाणार. याशिवाय शूजचेही स्कॅन केले जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -