मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वर्ष २०२३साठीच्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वात आधी आयसीसी पुरुष टी-२० टीम ऑफ द ईयरची घोषणा झाली आहे.
सोमवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या या संघात भारताचा दबदबा पाहायला मिळाला. भारताच्या चार खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे. पुरुषांच्या संघाचा कर्णधार आयसीसीने सूर्यकुमार यादवला बनवले आहे.
संघात सूर्याशिवाय यशस्वी जायसवाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह यांचाही समावेश आहे. संघात भारताचे ४, झिम्बाब्वेचे २, तर न्यूझीलंड इंग्लंड वेस्ट इंडिज, आयर्लंड, युगांडाचा प्रत्येकी एक एक खेळाडू आहे. म्हणजेच आयसीसीच्या या संघात भारताचा दबदबा पाहायला मिळत आहे.
आयसीसी मेन्स टी-२० टीम ऑफ द ईयर २०२३
१. यशस्वी जयसवाल (भारत)
२. फिल साल्ट (इंग्लंड)
३. निकोलसन पूरन (विकेटकीपर) (वेस्टइंडीज)
४. सूर्यकुमार यादव (कर्णधार) (भारत)
५. मार्क चैपमैन (न्यूजीलंड)
६.सिकंदर रजा (जिम्बाब्वे)
७. अल्पेश रमजानी (युगांडा)
८. मार्क अडायर (आर्यंलंड)
९. रवि बिश्नोई (भारत)
१०. रिचर्ड नगारवा (जिम्बाब्वे)
११. अर्शदीप सिंह (भारत)