Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीHealth: तुम्हाला पटापट खाण्याची सवय आहे का? तर हे आधी वाचा

Health: तुम्हाला पटापट खाण्याची सवय आहे का? तर हे आधी वाचा

मुंबई: अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की पटापट खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे अनेक आजार होऊ शकतात. यामुळे अनेकदा सांगितले जाते की जेवण नेहमी चांगले चावून खावे. जाणून घेऊया पटापट का खाल्ले नाही पाहिजे.

मॉडर्न आणि धावपळीच्या लाईफस्टाईलदरम्यान अनेकदा जेवण जेवले जाते. लवकर जेवण जेवल्याने शरीराला अनेक प्रकारचे आजार होतात. लवकर लवकर ऑफिसला जाण्याच्या नादात लोक पटापट खाऊन मोकळे होतात. मात्र हे जेवण नीट चावून खाल्ल्याने पचायला त्रासदायक ठरते. सोबतच जेवण नीट न पचल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते.

अपचनाची समस्या

लवकर लवकर खाल्ल्याने तोंडातील लाळ योग्य पद्धतीने काम करत नाही. यामुळे कार्ब्स नीट पचत नाहीत. लवकर लवकर जेवल्याने अपचनाचा त्रास संभवतो. यामुळे जेवण नीट चावून खावे.

डायबिटीजचा धोका

जे लोक पटापट खातात त्यांचे वजन वेगाने वाढते. लठ्ठपणामुळे डायबिटीजचा धोकाही वाढतो. यामुळे टाईप २ डायबिटीजचा धोका वाढतो.

गळ्यात अडकू शकते अन्न

अनेकदा लवकर लवकर जेवल्याने घश्यात अन्न अडकू शकते. यामुळे जेवण नीट चावून खाल्ले पाहिजे.

लवकर लवकर जेवल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम, गुड कोलेस्ट्रॉलची कमतरता आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -