Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीAlia Bhatt : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलिया भट्टच्या साडीवरील 'ती' चित्रे...

Alia Bhatt : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलिया भट्टच्या साडीवरील ‘ती’ चित्रे पाहिलीत का?

ती खास साडी राम मंदिराच्या सोहळ्यासाठी केली डिझाईन

अयोध्या : अयोध्येत काल राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) पार पडलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (RamLalla Pran Pratistha) सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी (Bollywood celebrities) आवर्जून हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित ते आयुष्मान खुराना, विकी कौशल असे अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले होते. सध्या त्यांच्या लाडक्या लेकीमुळे प्रचंड चर्चेत असलेलं बॉलिवूडचं क्युट कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळेस आलियाने परिधान केलेल्या साडीने विशेष लक्ष वेधून घेतले.

राम मंदिराच्या सोहळ्यासाठी सगळ्या बॉलीवूड सेलिब्रिटींनी पारंपरिक पोशाख केला होता. रणबीर कपूरने सदरा-धोतर, तर आलियाने मोरपिशी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. परंतु ही साडी एका विशेष कारणामुळे अत्यंत खास आणि चर्चेचा विषय बनली होती. संपूर्ण प्लेन साडी असूनही काठामुळे ही साडी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

तिच्या संपूर्ण प्लेन डिझाइन असलेल्या साडीच्या काठावर रामायणासंदर्भातील चित्रे (Ramayana picutres) रेखाटण्यात आली होती. तसेच या चित्रांमध्ये रामायणातील विविध प्रसंग होते. या साडीवर आलियाने खास शाल परिधान केली होती. तिच्या या साध्या व सुंदर लूकने सोशल मीडियावरही चाहत्यांना भुरळ पाडली आहे. आलियाची ही साडी खास राम मंदिराच्या सोहळ्यासाठी डिझाईन करण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -