Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीPimpri Chinchwad Fire : पिंपरी - चिंचवडमध्ये भीषण आग; दोन सख्ख्या भावांचा...

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी – चिंचवडमध्ये भीषण आग; दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू

लाकडाच्या वखारीला लागली आग

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) देखील आज मध्यरात्री अडीचच्या सुमारास लाकडाच्या वखारीला भीषण आग (Fire) लागली. वाल्हेकरवाडी येथे ही घटना घडली. या आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर परिसरातील लगतच्या अन्य निवासी इमारतीमधील सर्व रहिवाशांना पोलिसांच्या मदतीने इमारती बाहेर सुरक्षित रित्या स्थलांतरित करण्यात आले. अथक परिश्रमांनतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, लाकडाच्या वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. ही आग वेगाने पसरत गेली. विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर हे त्याला लागून असल्यामुळे ही आग आणि धूर ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर शेडमध्ये गेला. त्या शेडला एकच दरवाजा असल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला. तसेच त्या शेडमध्ये पोटमाळ्यावर अडकलेल्या दोन व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध झाल्या. आगीत पोटमळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला. ललित अर्जुन चौधरी (२१ वर्षे) आणि कमलेश अर्जुन चौधरी (२३ वर्षे) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.

मध्यरात्री अडीचच्या सुमारास परिसरातील सगळे रहिवासी झोपेत असताना अचानक आग लागली. गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचं दिसलं. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी बादलीच्या साहाय्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याच प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -