Sunday, July 14, 2024
HomeदेशAyodhya Ram Mandir : ज्याची सर्वांनाच उत्सुकता ते अयोध्येचे राम मंदिर नेमके...

Ayodhya Ram Mandir : ज्याची सर्वांनाच उत्सुकता ते अयोध्येचे राम मंदिर नेमके आहे कसे?

मंदिर परिसरात कोणत्या सुविधा असणार?

अयोध्या : ज्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Lalla Pran pratishtha) सोहळ्याची अवघ्या देशवासियांना आतुरता लागून राहिली आहे, तो क्षण अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. रामजन्मासाठी अवघा देश सजला आहे. आजवर कधीच झाले नसेल इतके भव्य राम मंदिर अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) उभारण्यात येत आहे. त्यामुळे हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर नेमका कसा असणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यानिमित्त हे मंदिर नेमके कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, सुविधा कोणत्या असतील आदी गोष्टींवर एक नजर….

मंदिरासाठी १८ एकर जागेत बांधकाम होईल, त्यातील ३५ टक्के जागेत बांधकाम असेल. उर्वरित जागेत रस्ते असतील. १० टक्के जागेत भाविकांसाठी विविध सुविधा असतील. मंदिराच्या ६७ एकर जागेत ५ लहान टेकड्या आहेत (अंगद टिला, कुबेर टिला, नल टिला, शेषनाग टिला, पिंडारक). पाचव्या म्हणजेच पिंडारक टेकडीवर मंदिर असेल.

कसे असणार राम मंदिर?

अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिराची लांबी ३६० फूट तर रुंदी २३५ फूट आहे. २.७ एकरवर मुख्य मंदिराचे बांधकाम तर ६७.७ एकर मंदिर उभारणी होणार आहे. ५७ हजार ४०० चौरस फुटांवर एकूण बांधकाम असेल. मंदिरासाठी १२ प्रवेशद्वारे असणार आहेत. १८ एकर मंदिर परकोटा (प्रदक्षिणा मार्ग) असणार आहे. राम मंदिराला एकूण ५ डोम व एकूण ३ मजले आहेत. यातील प्रत्येक मजल्याची उंची २० फूट आहे. तळमजल्यावर राममूर्ती, पहिल्या मजल्यावर श्रीराम पंचायतन तर दुसऱ्या मजल्यावर विविध देवतांच्या मूर्ती असणार आहेत.

मंदिर परिक्षेत्रात काय सुविधा असणार?

राम मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पर्यटक केंद्र उभारले आहे, तसेच बहुमजली वाहनतळ असणार आहे. भाविकांसाठी लॉकर रूम असणार आहे. भाविकांसाठी सरकत्या जिन्यांची सोय असणार आहे. प्रशासकीय कार्यालय व कर्मचारी निवास असणार आहे. मंदिराच्या चारही दिशांना १५ मिनिटांच्या अंतरावर स्वच्छतागृहांची सुविधा असेल. तसेच बँका, एटीएम आदी सुविधा देखील असणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -