मुंबई: अयोध्येत सोमवारी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन होत आहे. यासाठी क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांना निमंत्रित कऱण्यात आले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मालाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार विराट कोहली अयोध्येत पोहोचला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा आणि अनिल कुंबळेही अयोध्येत पोहोचल्याचे वृत्त आहे. कुंबळे एअरपोर्टवर दिसले.
सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करण्यात आलेत. यात दावा केला जात आहे की कोहली अयोध्येत पोहोचला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटर अनिल कुंबळेही अयोध्येत पोहोचले आहेत. वेंकटेश प्रसादही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी मिताली राज, हरमनप्रीत कौर, महेंद्रसिंग धोनी आणि रवीचंद्रन अश्विन यांनाही बोलावण्यात आले आहे.
Virat Kohli has reached Ayodhya after the Practice Session 😍❤️#viratkohli #AyodhaRamMandir pic.twitter.com/adQQyhtfy5
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrogn_edits) January 21, 2024
भारताची स्टार शटलर सायना नेहवालही अयोध्येत पोहोचली आहे. ती म्हणाले, माझे सौभाग्य असे की मला या कार्यक्रमात सामील होण्याची संधी मिळाली. आपण इतक्या वर्षानंतर जल्लोष साजरा करत आहोत. आता फक्त त्या क्षणांची प्रतीक्षा जेव्हा आम्ही श्री रामांचे दर्शन घेऊ.
भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून कसोटी मालिका खेळवली जात आहे. यासाठी टीम हैदराबाद येथे पोहोचली आहे. कोहलीही हैदराबादला गेला होते. तेथे त्याने सराव सत्रात भाग घेतला. यानंतर अयोध्येसाठी निघाला. कर्णधार रोहित शर्मानेही सराव सुरू केला.