Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाकोट्यावधींची मालकीण आहे सानिया मिर्झा, जाणून घ्या किती आहे तिची नेटवर्थ

कोट्यावधींची मालकीण आहे सानिया मिर्झा, जाणून घ्या किती आहे तिची नेटवर्थ

मुंबई: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा(sania mirza) आपल्या खेळासोबतच आपल्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. ती देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. आम्ही आज तुम्हाला तिच्या नेटवर्थबद्दल सांगणार आहोत.

सानिया मिर्जाने जानेवारी २०२३मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेतल्यानंतर टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तिने आपल्या करिअरमध्ये एकूण सहा ग्रँड स्लॅम जिंकले यातील दोन ग्रँड स्लॅम तिने २०१५मध्ये जिंकले होते. २००९, २०१२, २०१४, २०१६ मध्ये सानियाने एक एक ग्रँडस्लॅम जिंकला होता.

एका रिपोर्टनुसार, सानिया मिझार्ची २०२३मध्ये एकूण नेटवर्थ २६ मिलियन डॉलर म्हणजेच २१० कोटीहून अधिक आहे. सानिया ब्राँड एंडॉर्समेंटसाठी ६० ते ७५ लाख रूपये घेते.

सध्या सानिया मिर्झा आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सानियाने आपला पाकिस्तानी नवरा शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला आहे. दोघांना एक मुलगा आहे. याचे नाव इजहान मिर्झा मलिक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -