मुंबई: अयोध्येच्या राम मंदिरात २२ जानेवारी म्हणजेच आज श्री रामांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या प्राण प्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशभरात भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
राम मंदिरा तीर्थक्षेत्र ट्रस्टने श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातील विद्वान आणि वरिष्ठ ज्योतिषाचार्यांकडून याचा शुभ मुहूर्त काढला आहे.
८४ सेकंदाचा मुहूर्त
श्री रामांची प्राणप्रतिष्ठा अति सूक्ष्म मुहूर्तात होईल. यासाठी केवळ ८४ सेकंदाचा वेळ मिळणार आहे. प्राण प्रतिष्ठेचा हा मुहूर्त पंडित गणेश्वर शास्त्री यांनी काढला आहे.
असे मानले जात आहे की या शुभ मुहूर्ताचा हा क्षण दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे ३२ सेकंदापर्यंत असेल.
२२ जानेवारी तारीख का निवडली?
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १७ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंतची ५ तारीख दिल्या होत्या. यात २२ जानेवारीला श्रेष्ठ मानण्यात आले.
ज्योतिष गणनेनुसार २२ जानेवारी मुहूर्त चांगला आहे. ही तिथी आणि मुहूर्त अग्निबाण, मृत्यूबाण, चोरवाण, नृपवाण आणि रोगवाण मुक्त आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेता अयोध्येत श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी शुभ तिथी आणि मुहूर्त ठरवण्यात आला.