Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीJay Shri Ram : प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळी घरी प्रभु रामाची पूजा कशी...

Jay Shri Ram : प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळी घरी प्रभु रामाची पूजा कशी कराल?

जाणून घ्या विधी, साहित्य आणि पूजेची पद्धत

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) आज २२ जानेवारीला अभिजीत मुहूर्तावर प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना (RamLalla Pran Pratishtha) होणार आहे. आजचा दिवस अतिशय ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारी प्राणप्रतिष्ठा होणार असून सायंकाळी श्री राम ज्योती प्रज्वलित होणार आहे. यामुळे अयोध्या उजळून निघणार आहे. शिवाय देशभरातही सर्वत्र दिव्यांचा लखलखाट करण्यात आला आहे.

या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता अनेक हिंदूंना अयोध्येत जायची इच्छा होती. मात्र, ते शक्य झाले नसले तरी काही हरकत नाही. या दिवशी विधीनुसार आपल्या घरी भगवान रामाची पूजा करून तुम्ही पुण्य लाभ मिळवू शकता. आज रामललाच्या प्राण-प्रतिष्ठापनेदिनी आपण आपल्या घरी भगवान रामाची पूजा कशी करावी. प्रभू रामाची उपासना पद्धत, मुहूर्त, मंत्र, आरती, नैवेद्य इत्यादींबद्दल जाणून घेऊया.

रामलल्लाची पूजा कधी करावी?

आज सकाळपासून ब्रह्मयोग आणि मृगाशिरा नक्षत्र तयार झाले असून सकाळी ७:१५ पासून सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार झाला आहे. या वेळेपासून तुम्ही रामलल्लाची पूजा करू शकता. दुपारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पाहून पुण्य कमवावे.

प्रभू रामाची पूजा करण्याची पद्धत –

सर्वप्रथम लवकर उठून आंघोळ करून शुद्धी करा. स्वच्छ कपडे घाला. ज्या ठिकाणी प्रभू रामाचा फोटो, मुर्ती किंवा राम दरबार ठेवला आहे ती जागा गंगाजलाने शुद्ध करा. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. रामलल्लाची मूर्ती किंवा चित्र लाकडी चौरंग किंवा पाटावर स्थापित करा. त्यानंतर पंचामृताने मूर्तीला स्नान करा. त्यानंतर प्रभू रामाला पाण्याने अभिषेक करा. त्यांना कपडे घाला. चंदनाने टिळा लावा. त्यांना फुले आणि हारांनी सजवा.

यानंतर रामललाला अक्षता, फुले, फळे, धूप, दिवा, नैवेद्य, तुळशीची पाने, सुगंधी इत्यादी अर्पण करा. तुम्ही त्यांना सुवासिक लाल, पिवळी, पांढरी फुले अर्पण करू शकता. तुम्ही रामलालला रसगुल्ला, लाडू, हलवा, इमरती, खीर इत्यादी मिठाई अर्पण करू शकता. आपण घरी तयार केलेले अन्न देखील देऊ शकता.

पूजा करताना राम नामाचा जप करावा. श्री राम चालिसा पठण करा. त्यानंतर तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा कापूर लावून रामाची आरती करावी. घरात दिवे लावावे.

प्रभू रामाची पूजा केल्याने मिळते सकारात्मक उर्जा

घरी राम दरबार किंवा प्रभू रामाची पूजा केल्याने कुटुंबात एकता टिकून राहते. रोज रामाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. ज्या घरामध्ये राम नामाचा जप केला जातो त्या घरात नेहमी सकारात्मक उर्जा राहते. प्रभू रामाची रोज पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता आणि सर्जनशीलता वाढते. प्रभू रामाची पूजा केल्याने माता सीता तसेच हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे सर्व वाईट कामे दूर होऊ लागतात आणि साधकाच्या घरात आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -