Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीअयोध्येतील राम मंदिर हे भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात

अयोध्येतील राम मंदिर हे भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात

अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनाला जाण्याचे देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

नागपूर : अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात रामलल्ला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असून भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येला जावूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले.

अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होवून गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणाऱ्या क्षणाचे साक्षीदार होत असल्याचा अभिमान आहे. हा क्षण रामनगर येथील राम मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर बघण्यासाठी फडणवीस उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमास उत्तर भारतीय मोर्चाचे सुरेंद्र पांडे, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, शैलेश जोगळेकर, संजय बंगाले, जयप्रकाश गुप्ता, शाम पत्तरकीने, प्रणिता फुके, अश्विनी जिचकार, संदीप गवई आदी उपस्थित होते.

भारतीय इतिहासात २२ जानेवारी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राम जन्मभूमीसाठी अनेक आंदोलने झाली. तसेच स्वातंत्र्यानंतर यासाठी संकल्प करण्यात आला. राजकीय स्वातंत्र्यासोबत आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे अयोध्या येथे भव्य राम मंदिर पूर्ण झाले आहे.

कारसेवकांचे बलिदान तसेच कोठारी बंधू यांनी भगवा प्रस्तापित करण्यासाठी केलेला संघर्ष अतुलनिय होता. सर्वांच्या त्यागातून व बलिदानातून आज भव्य राम मंदिर निर्माण झाले आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांना अयोध्येला जायचे आहे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रामनगर येथील मंदिराला भेट देवून श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात राम लल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापणेचा क्षण सर्वांना अनुभवता यावा तसेच या क्षणाचे साक्षीदार होता यावे यासाठी या परिसरात एलएडी स्क्रीनद्वारे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे तीन तास चाललेल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी कारसेवक म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला. बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपारिक नृत्य करुन राम जन्मभूमी उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -