
नवी दिल्ली: राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा(ram mandir pran pratishtha) समारंभात देशातील अनेक उद्योगपती पोहोचले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येत पोहोचले होते. एअरपोर्टवरून संपूर्ण कुटुंब कडक सुरक्षा व्यवस्थेत राम मंदिरात पोहोचले.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानीही आपल्या कुटुंबासमवेत अयोध्येत पोहोचले. त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगी इशा अंबानी, जावई आनंद पिरामल, मुलगा आकाश, अनंत अंबानी, सून श्लोका अंबानी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण कुटुंब अतिशय उत्साही होते.
मुकेश अंबानी कुटुंबाने राम मंदिर ट्रस्टला २.५१ कोटी रूपयांचे दान केले. या निमित्त मुकेश अंबानी म्हणाले, भगवान श्रीराम येत आहे. २२ जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी असेल. मला या क्षणाचा साक्षीदार होता आले यासाठी मी सौभाग्यवान आहे. तर नीता अंबानी म्हणाल्या, जय श्री राम, हा एक ऐतिहासिक दिवस आहे. मला भारतीय संस्कृतीवर गर्व आहे.
रामाचे दर्शन घेऊन धन्य झालो
मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी म्हणाला,, हा दिवस इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल. तर इशा अंबानी म्हणाले, आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे. इशा अंबानीसोबत तिचे पती आनंद पिरामलही येथे पोहोचले होते. ते म्हणाले, जय श्री राम.