Thursday, October 30, 2025
Happy Diwali

अयोध्येवरून परतल्यावर मोदींनी केली पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा, १ कोटी घरांवर लागणार रूफटॉप सोलार

अयोध्येवरून परतल्यावर मोदींनी केली पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा, १ कोटी घरांवर लागणार रूफटॉप सोलार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिरामध्ये भगवान रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर मोठ्या सोलार योजनेची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की अयोध्येत रामल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने हा संकल्प मांडला की देशवासियांच्या घराच्या छतावर त्यांची सोलार सिस्टीम असावी. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार एक कोटी घरांमध्ये या योजनेंतर्गत रूफटॉप सोलार असेल.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर सांगितले, सूर्यवंशी भगवान श्री राम यांच्या आलोके जगातील सर्व भक्तगण सदैव उर्जा प्राप्त करतात. अयोध्येत प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने माझा हा संकल्प आणखी दृढ झाला की भारतवासियांच्या घराच्या छतावर त्यांचे स्वत:चे सोलर रूफ टॉप सिस्टीम असावा.

अयोध्येवरून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला की आमचे सरकार १ कोटी घरांवर रूफटॉ सोलार लावण्याच्या लक्ष्यासह पंतप्रधान सूर्योदय योजनेचा प्रारंभ करणार. यामुळे गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांचे विजेचे बीलही कमी होईल सोबतच भारत उर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल.

ही कॅलेंडरवरील एक तारीख नाही तर एक नव्या कालचक्राचा उगम

पंतप्रधान मोदींनी उपस्थित लोकांना सांगितले ते आताही गर्भगृहात प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमादरम्यान जाणवलेल्या त्या दिव्य स्पंदनांचे स्मरण येत आहे.पंतप्रधान मोदींनी आपल्या ३६ मिनिटांच्या भाषणात म्हटले की २२ जानेवारी २०२४चा हा सूर्य नवे तेज घेऊन आला. ही कॅलेंडरवरची एक तारीख नाही तर एका नव्या कालचक्राचा उगम आहे. आमचे रामल्ला आता तंबूत राहणार नाहीत तर ते या दिव्य मंदिरात राहतील.

Comments
Add Comment