Marathi movie: 'सापळा', प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नवा थरारपट...

मराठीत फारच दुर्लभ अश्या गूढकथा प्रकारात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'सापळा'. गूढकथेचा प्रकार वापरत दोन कथालेखक एकत्र आल्यानंतर काय घटना घडू शकतील या कथाकल्पनेवर आधारित ‘सापळा’ हा थरारक चित्रपट निखिल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची झलक नुकतीच एका सोहळयात प्रकाशित करण्यात आली. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘सापळा’ चित्रपटाच्या दादर येथील प्लाझा सिनेमागृहात झालेल्या या झलक प्रकाशन सोहळयाला चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, ‘मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. अशाप्रकारच्या कथा या प्रेक्षकांना नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भुरळ घालतात.


एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाटयसंहिता वाचनात आली. आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठया पडद्यावर आणण्याचा मोह मी आवरू शकलो नाही.’ ‘सापळा’ या चित्रपटात मराठीतील उत्तम कलाकारांचा अभिनय पाहण्याची संधी मिळणार आहे.


नवीन कथालेखक आणि अनुभवी लेखक अशी दोन डोकी एकत्र आल्यावर घडलेल्या भयानक घटनेचे चित्रण करणाऱ्या या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी, नक्षत्र मेढेकर, सुनील जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रद्योत प्रशांत पेंढारकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून महाराष्ट्रात २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.

Israel - Iran War : आखाती देशांतील महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य शासनाच्या अत्यावश्यक सूचना

इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा

Thane: अभिनेत्री ज्युनियर कलाकारांना आमिष दाखवून करत होती फसवणूक; सेक्स रॅकेट प्रकरणात अटकेत

ठाणे: ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Trimbakeshwar Temple Video: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

नाशिक: होळी, धुलिवंदनाच सण, सलग सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची

सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेटविश्वात पदार्पण, पुढे बॉलिवूड स्टार बनला; कोण आहे हा अभिनेता?

मुंबई: कपिल देव, इरफान पठाण, सुनील गावस्कर, हरभजन सिंग आणि शिखर धवन यांच्यासह अनेक क्रिकेट स्टार्सनी बॉलिवूड

POSH Audit : महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये ३० दिवसांत 'पॉश ऑडिट करा नाहीतर...; महिला आयोगाचे आदेश

मुंबई: नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश ॲक्टची