Friday, March 21, 2025

अनमोल वेळ…

मनस्विनी: पूर्णिमा शिंदे

दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच खूप सारे प्लॅन्स असतात. योजना आखून तयार असतात. पण त्या इमाने-इतबारे पाळल्या जात नाहीत. वेळेवर वेळेचे पालन करणे, वेळेचा सदुपयोग करणे यालाच वेळेचे नियोजन म्हणतात. व्यवस्थापन म्हणतात. वेळे असा आहे. ती वेळच्या वेळी काटेकोरपणे पाळावी. ती वेळच्या वेळी वेळेवर आपली वेळ निभावते. ती वेळ झटकन निघून जाते. त्या त्या वेळेला आपण टाळू शकत नाही. थांबू शकत नाही, तर मागे उरतो फक्त पश्चाताप. हो म्हणून म्हणतात ना, वेळच्या वेळी वेळेवर वेळ दवडू नको.

रोज आपण जगतो ते वेळेवर. घड्याळाच्या सेकंदाला धावणारे मुंबईकर आपणही. दैनंदिन जीवनात जीवन हे धावणारे आहे. एका मिनिटासाठी एसटी, रेल्वे चुकली, बस चुकली, तर सगळं पुढचं नियोजन बारगळतं आणि दिवस मात्र खराब जातो. ऊठा, कामाला लागा, धावा, पकडा, पळा, थांबा हेच आणि हेच. म्हणून माहीत नसतं कधी वेळ ही अतिशय वेगवान असते, हातातून निसटून जाणारी. वाळूचे एक यंत्र असतं. ते समोर उलटे केले की पुढे सरकणारी वाळू झरखंडी निघून जाते, रीती होते. तसे आपल्या हातात आहे, तोवर जगून घ्या. पुन्हा ऊठा, धावा, पकडा, पळा हेच. थांबला तो संपला. थांबायचं, तेही आवश्यकता असेल तर नाही तर पुढे जा, चालत राहा. केवढी मोठी ती कामांची यादी, ध्येय, महत्त्वाकांक्षा, स्वप्न, मनोरे, योजना, स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जबाबदारीचे ओझं उचलण्यासाठी केवळ आणि केवळ पळा.

आपल्या सध्याच्या स्पर्धात्मक बेगडी जीवनात नित्यनेमाने वेळ पाळावीच लागते. वेळेचे गणित जसं सगळ्यांना अनुभवता येतं. योग्य वेळेला ‘हो’ म्हटलं ‘नाही’ निर्णय चुकला, योग्य वेळेला नाही म्हटलं. नाही वेळ फसली. नवं लग्न जमलेल्या नवख्या नियोजित मुला-मुलींना तर भेटणं हे सुद्धा एक कोडे झालेलं आहे. वेळेवर आला नाही, वेळेचा सदुपयोग नाही का, कसा कुठे पहिली भेट. ट्राफिक जाम, हल्ली मुलं-मुली कुणाची वाट पाहत नाहीत. तापट स्वभाव, सामंजस्याचा अभाव ऐकून नाही घेतलं. चला चांगलं झालं. वाट पाहणं, समजून घेणं. वेळ देणं. नाहीच तरी पुढे जाऊन आणखीन काय होण्यापेक्षा आधीच झालं. अतिउत्तम. योग्य वेळी, योग्य निर्णय, अचूक निर्णय, तर त्या वेळेला सुद्धा खरंच महत्त्व आहे. योग्य उमेदवार असून सुद्धा मुलाखतीसाठी वेळेवर पोहोचला नाही तर… तशी वेळ आपल्या हाती नसतेच! पुढे हातात असतं ते आपल्या घड्याळ म्हणून वेळ सांभाळा आणि वेळेवर सगळं करा, दुसऱ्यांची वेळेची कदर करा, कृतज्ञ व्हा, दिलेली वेळ पाळा, वेळेला उभे राहा, वेळ काढा, वेळ वाचवा, वेळ चोरा, वेळीच सावधान व्हा. यालाच टाईम मॅनेजमेंट म्हणतात.

गेलेली वेळ पुन्हा येत नाही. उगाच भारतीय घड्याळ एक तास पुढे, उशिरा वगैरे असं काही बोलू नये. याच भारतात अनेक वेळ पाळणारी भव्य-दिव्य व्यक्तिमत्त्व, आदर्श महात्मे होऊन गेले. त्यांचे गौरवास्पद कार्यदेखील वेळेवरच होते आणि हो वेळेवर व्यक्त व्हा. वर्षानुवर्षे मनात ठेवून नंतर सांगणं, गैरसमज, पश्चातापाची वेळ येते म्हणून वेळेवर व्यक्त होण्याला सुद्धा तितकच महत्त्व आहे. त्याने देखील निर्णय, नशीब, भविष्य बदलते. रोजच्या दिनचर्येतून थोडासा स्वतःसाठी वेळ ठेवत जा आणि योगा, प्राणायाम, वाचन यातून जो वेळ मिळेल, तेव्हा आत्मपरीक्षण करत जा. आज-काल आपण इतरांकडे पाण्याचा नादात आपण स्वतःकडे पाहण्याचे विसरून गेलेलो असतो. वेळीच स्वतःला जपा. या गतिमान युगात सध्या स्केटिंग न लावताही स्केटिंगसारखं पळतोय. हीच वेळ आहे आपल्या जीवनशैलीत वेळेचा योग्य वापर नको, तर सदुपयोग करा. परीक्षा आली की धावपळ, अभ्यास, जागरण… मग प्रकृती अस्वास्थ्य. तहान लागली की विहीर खणायची, सण आला की ऋण काढायचं, वेळेची बचत असो वा पैशाची जर वेळेवर झाली की, ती हवी तेव्हा महत्त्वाच्या तातडीच्या वेळी पुरवठ्यास येते. लगबग असावी घाई नको बेफिकीर नसावं. उदाहरणार्थ – प्रवास साधा बसचा रेल्वेचा असो व विमानाचा जवळचा लांबचा दूरचा. सर्व ठिकाणी वेळेचे बंधन असतंच तेथे तडजोड नसते.

सर्व आपापल्या पद्धतीने प्रवास कायम करत असतात. शाळेला उशीर झाला, तर बाकावर उभे राहायला लागते किंवा मैदानाला चार फेऱ्या, वेळेवर अभ्यास केला नाही तर एक शिक्षा पाच वेळा होते, रेल्वे चुकली, एखाद्या पेशंटला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, रस्ता क्रॉस करताना सिग्नल सुटला वेळेवर पोहोचलो नाही कुठे! तर येणारे दडपण, भीती, घाई लगबग त्यापुढे होणारा त्रास आणि चुकलेला निर्णय. धावपळीमध्ये असं सगळ्यांनाच वेळोवेळी अनुभवास येते. कुठेतरी आनंदावर विरजण येते. म्हणून वेळ चांगली तर सगळे ठीक!

वेळ वाईट तर परिस्थिती वाईट! असंच बोललं जातं. प्रत्यक्ष वेळही सोन्यापेक्षाही किमती आहे, कारण सोनं दुकानात विकत मिळेल हो! पण कोणी तुमच्यासाठी वेळ देईल का? विचारा! या जगात वेळ ही सर्वात सामर्थ्यवान मौल्यवान गोष्ट आहे की, जी कोणी कोणासाठी सहज उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून वेळ दाखवून देते, ठरवून देते, शिकवून जाते, ती वेळ असते. ती मौल्यवान अनमोल असते म्हणून वेळेला, वेळेवर जपा! इतकेच!! मै समय हूं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -