प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सोमवार २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. या सुटी विरोधात मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने रविवारी सुनावणी घेऊन फेटाळली.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घटनेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करत सुटी देण्यात आल्याचा आरोप याचिका करणाऱ्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निवाड्यातील निरीक्षणांवर याचिका करणाऱ्यांनी आक्षेपार्ह विधाने केली. दोन्ही बाजू ऐकून घेऊन न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठाने सार्वजनिक सुटीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी केलेली याचिका फेटाळली.
ही याचिका जनहित याचिका नसून खासगी हितसंबंधांसाठी आणि प्रसिद्धीसाठी केलेली असल्याचे दिसते. अशा प्रकारची याचिका केल्याबद्दल आम्ही याचिकाकर्त्यांना जबर दंड लावू शकतो. पण याचिकाकर्ते हे विद्यार्थी असल्याचे लक्षात घेऊन आम्ही दंडाचा आदेश देण्याचे टाळत आहोत. भविष्यात या विद्यार्थ्यांनी व्यक्तिश: अशाप्रकारची निरर्थक आणि चुकीची याचिका करण्याची चूक करू नये, अशी सक्त ताकीद देत उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने सार्वजनिक सुटीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी केलेली याचिका फेटाळली.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…