Saturday, June 21, 2025

Eknath Shinde: निमंत्रणानंतरही अयोद्धेला जाणार नाहीत मुख्यमंत्री शिंदे, एक्सवरुन कारण केलं स्पष्ट...

Eknath Shinde: निमंत्रणानंतरही अयोद्धेला जाणार नाहीत मुख्यमंत्री शिंदे, एक्सवरुन कारण केलं स्पष्ट...

श्री राम जन्मभूमी ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील या सोहळ्याचं निमंत्रण आले आहे. तरीदेखील एकनाथ शिंदे या सोहळ्याला जाणार नाहीत. त्यांनी स्वतःच्या एक्स अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.


एकनाथ शिंदे यांनी एक्सवर राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे, जय श्री राम‌‌! अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलं आहे. यासाठी मोदींचे शतशः आभार. अयोध्येमध्ये सोमवारी श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच.





देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस आणि पवार या सोहळ्याला जाणार नाहीत. याउलट मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन अयोध्या दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री लवकरच या दौऱ्याची माहिती जाहीर करतील.

Comments
Add Comment