ऐकलंत का!: दीपक परब
कलर्स मराठीवरील “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका प्रेक्षकांची आवडती ठरत आहे. बाळूमामांच्या चरित्रावर आधारित या मालिकेत एक विशेष कथा पाहायला मिळणार आहे. बाळूमामा मेंढ्यांना घेऊन सतत भ्रमण करत असताना अनेक पद्धतीची, चित्र विचित्र स्वभावाची माणसे त्यांना भेटत असतात. मामांनी नेहमीच अतिशय शांतपणे त्या माणसांच्या स्वभावात अपेक्षित बदल घडवून त्यांना सत्याची प्रचिती करून दिली आहे. या सगळ्या प्रवासात असंख्य लोकांचे आयुष्य बदलले आहे. बाळूमामांच्या चरित्रातली अशीच एक कथा आता पाहायला मिळणार आहे.
या कथेतील एका जोडप्याच्या घरी चालत असलेल्या रीतीप्रमाणे श्री रामाचा उत्सव असतो. नवरा कट्टर राम भक्त असून बायको बाळूमामांची भक्त असते. या उत्सवात येण्यासाठी ती बाळूमामांना निमंत्रण देते. परंतु नवरा श्री रामाच्या उत्सवासाठी खूप उत्साही व आग्रही असतो हे बाळूमामांना देखील जाणवते. अशा परिस्थितीत पत्नीची मात्र द्विधा मनस्थिती होते. या राम भक्ताला बाळूमामा श्री रामाची प्रचिती देणार आहेत हे पाहण्यासाठी नक्की बघा “बाळूमामाच्या नावानं चांगभलं”, रविवार, २१ जानेवारी रोजी दु. १.०० व संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर.