ऐकलंत का!: दीपक परब
छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे आज आपल्यासाठी हिमानगाचे टोक आहे. बऱ्याच घटना काळाच्या उदरात अज्ञात आहेत. अशा काळात महाराजांची प्रत्येक योजना यशस्वी होण्यासाठी त्या योजनेचा पाया बनून राहिलेले बहिर्जी नाईक हे जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ठरतात. त्यांच्या योजनाच इतक्या गुप्त असायच्या की, त्यांचा मागोवा घेणेसुद्धा शक्य नव्हते. मात्र अशा काळात स्वराज्य हे स्वप्न या मातीत रुजवणारे शिवराय आणि या स्वप्नासाठी जीव उधळायला सुद्धा तत्पर असणारे मावळे या साऱ्यांचे अवलोकन केले तर त्यातूनच बहिर्जी नावाची वीण हळुवार उलगडत जाते.
हेच दाखवण्याचा प्रयत्न “बहिर्जी” या चित्रपटातून केला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा वस्तुनिष्ठ वेध घेऊनच या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. सध्या या चित्रपटाचे पहिले पुष्प भेटीला आले असून लवकरच याबाबतचे सारे चित्र स्पष्ट होणार आहे.
“सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय… बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार हाय…” अशी टॅगलाईन असणाऱ्या “बहिर्जी” या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…