
मुंबई: भगवान श्री रामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. २२ जानेवारीा पौष शुक्ल द्वादशीला अभिजीत मुहूर्तावर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा कार्यक्रम संपन्न होईल. तर राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्राण प्रतिष्ठा समारोहासाठी ३ हजार व्हीव्हीआयपीसह ७ हजार लोकांना आमंत्रित केले आहे.
उद्योगपतींची यादी
मुकेश अंबानी गौतम अदाणी रतन टाटा कुमार मंगलम बिड़ला एन चंद्रशेखरन अनिल अग्रवाल एनआर नारायण मूर्ति
खेळाडूंची यादी
सचिन तेंदुलकर विराट कोहली महेंद्र सिंह धोनी दीपिका कुमारी
सिने कलाकारांची यादी
अमिताभ बच्चन अक्षय कुमार अनुपम खेर माधुरी दिक्षित चिरंजीवी संजय लीला भंसाली मोहनलाल रजनीकांत धनुष रणदीप हुडा रणबीर कपूर अनुष्का शर्मा कंगना रनौत ऋषभ शेट्टी मधुर भंडारकर अजय देवगण जॅकी श्रॉफ टाइगर श्रॉफ यश प्रभास आयुष्मान खुराना आलिया भट्ट सनी देओ
सुप्रीम कोर्टाच्या ५ न्यायाधीशांना मिळाले आमंत्रण
मंदिर ट्रस्टकडून सुप्रीम कोर्टाच्या ५ न्यायाधीशांना आमंत्रण देण्यात आले आहे. यांनी राम मंदिराबाबत ऐतिहासिक निर्णय सुनावला होता.