Wednesday, March 11, 2026

plane crash: अफगाणिस्तानच्या हद्दीत कोसळलं भारतीय विमान...

plane crash: अफगाणिस्तानच्या हद्दीत कोसळलं भारतीय विमान...
अफगाणिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे प्रवाशी विमान अफगाणिस्तानच्या बदखशान येथे कोसळलं आहे. अफगाणिस्तानच्या स्थानिक मीडियाने याबाबतची माहिती दिली दिली आहे. अफगाणिस्तान मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मॉस्कोला जाणारे भारतीय विमान शनिवारी बदखशानच्या वाखान भागात कोसळले. तालिबानच्या सरकारने या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. तोपखानेह पर्वतावर हे प्रवासी विमान कोसळल्याची माहिती अफगाणिस्तानने दिली आहे. सरकारी यंत्रणेकडून या भागात शोधमोहिमेसाठी टीम पाठवण्यात आली आहे. या विमान दुर्घटनेचं कारण आणि जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Comments
Add Comment