मुंबई: श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला सर्व देशी आणि परदेशी दारूची दुकाने, रेस्टॉरंट, बार, हॉटेल आणि क्लब सर्व बंद राहणार आहेत.
अयोध्येत २२ जानेवारीला भगवान रामांच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासाठी देशभरातून हजारो लेक सामील होत आहेत आणि कोट्यावधी लोक आपापल्या घरात दिवे लावून सण साजरा करणार आहेत. या दरम्यान देशातील विविध राज्यात सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा, महाराष्ट्र आणि गोवा येथील राज्यांत सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय राजस्थान, गुजरात आणि उत्तराखंड सरकारने २२ जानेवारीला अर्ध्या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.
अनेक राज्यांमधील सरकारने या निमित्ताने ड्राय डेची घोषणा केली आहे. याचा अर्थ आहे की या दिवशी या राज्यांमध्ये दारू विकली किंवा खरेदी केले जाणार नाहीत.
ज्या राज्यांमध्ये ड्राय डे असणार आहे त्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे की या राज्यात ड्राय डे राहणार आहे.