Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज मराठा आंदोलक निघाले मुंबईकडे!

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज मराठा आंदोलक निघाले मुंबईकडे!

तत्पूर्वी पत्रकार परिषद घेत काय म्हणाले मनोज जरांगे?

जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच करणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणबी प्रमाणपत्रे शोधण्याचे काम सुरु असले, तरी आरक्षणाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम देखील संपला आहे. त्यामुळे ठरलेल्या निर्णयानुसार मनोज जरांगे आणि मराठा समाज (Maratha samaj) आज मुंबईकडे पायी रवाना होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. २६ जानेवारीपासून मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. आमची पोरं जर मोठी करायची असतील तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही. आरक्षण मुंबईतच आहे. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी असेन की नाही माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालं हवं, असं मनोज जरांगे म्हणाले.

जरांगे म्हणाले, मराठा समाजातील पोरांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा, ही पोरं मुंबईच्या दिशेने निघाली आहेत. मायबाप मराठ्यांना विनंती आहे, २६ तारखेला मुंबईला राज्यातील सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं. माझं शरीर मला साथ देत नाही. मी असेन किंवा नसेन पण मला माहित नाही पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका. सरकारला ७ महिने वेळ दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही दोन ते तीन खिंडा लढवणार आहोत. मुंबईत मराठ्यांचा कोटींचा आकडा दिसेल. शेवटची लढाई आहे. त्यामुळे सर्व मराठ्यांनी घराबाहेर पडा. छातीवर गोळ्या पडल्या तरी मी आता मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार

आंतरवाली सराटीतूनच मी उपोषण करत निघणार आहे. सरकार मराठ्यांना वेठीस धरत असलेत तर आम्ही देखील आता मागे हटणार आहे. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी सरकार आरक्षण देत नसेल तर लढावं लागेल. उपोषणामुळे शरीर आता साथ देत नाही. पण तुम्ही विचार मरु देऊ नका. आता आरक्षण देऊन पोरांच्या डोक्यावर गुलाल टाकायचं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबच चर्चा होते पण आरक्षण मिळत नाही. सर्वांनी शांततेत आंदोलन करावे, कोणी उद्रेक,जाळपोळ केली तर पोलिसांच्या स्वाधीन करा, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम

मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारडून त्यांचे आंदोलन थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अनेकदा सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. बच्चू कडू यांच्या मार्फत देखील सरकारने जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या दारात मरण आले तरीही चालेल पण आपण मुंबईला जाणारच आणि मराठा आरक्षण मिळवणारच असे जरांगे म्हणाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -