Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाIPL Title Sponsor : आयपीएल स्पॉन्सरशिप पुढील पाच वर्षे टाटा समुहाकडेच!

IPL Title Sponsor : आयपीएल स्पॉन्सरशिप पुढील पाच वर्षे टाटा समुहाकडेच!

दरवर्षी देणार तब्बल ‘इतके’ कोटी

मुंबई : मागील काही महिन्यांपासून आयपीएलची (IPL 2024) क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड चर्चा आहे. मुंबई इन्डियन्सच्या कॅप्टनवरुन तर विश्वचषकानंतर आयपीएल कायमच चर्चेत राहिली. आयपीएलची ही वाढती क्रेझ पाहून त्याच्या टायटल स्पॉन्सरशिपच्या किमती वाढल्या. गेली दोन वर्षे टाटा समूह (Tata Group) टायटल स्पॉन्सर (Title Sponsor) होता. यंदा या स्पर्धेत टाटासह आदित्य बिर्ला समूह (Aditya Birla Group) होता. पण अखेरीस टाटा समूहानेच बाजी मारली आहे. पुढील पाच वर्षे टाटा समूहच टायटल प्रायोजक राहणार आहे आणि त्यासाठी त्यांनी दरवर्षी ५०० कोटी रुपये म्हणजेच एकूण २५०० कोटी रुपयांची बोली लावली आहे.

टाटा सन्सने २०२८ पर्यंत आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे. टाटा सन्सने आयपीएल २०२४ ते २०२८ च्या टायटल प्रायोजकत्वासाठी (IPL Title Sponsor) दरवर्षी ५०० कोटी रुपयांची बोली लावली आहे. या आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपच्या स्पर्धेत टाटासह आदित्य बिर्ला समूह होता. टाटाने लावलेली बोली आदित्य बिर्ला समूहाच्या बोलीशी जुळत होती असंही समोर आलं आहे. मात्र, अखेरीस टाटा सन्स भविष्यात या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा टायटल स्पॉन्सर म्हणून कायम राहणार आहे.

बीसीसीआयला दरवर्षी मिळणार ५०० कोटी

गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी बीसीसीआयने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग प्रायोजकत्वासाठी निविदा (Tendor) जारी केली होती. १४ जानेवारी रोजी आदित्य बिर्ला समूहाने यासाठी २५०० कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यानंतर टाटा समूहाने हीच बोली लावण्याचा निर्णय घेतल्याची बातमी शुक्रवारी संध्याकाळी आली. टाटा समूह गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचा प्रायोजक आहे. गेल्या दोन वर्षात म्हणजेच आयपीएल २०२२ आणि २०२३ मध्ये प्रायोजकत्वासाठी टाटा समुहाने बीसीसीआयला ६७० कोटी रुपये दिले. आता आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशिपची रक्कम वाढली आहे.

आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपच्या किमती वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आयपीएलची वाढती क्रेझ आहे, याशिवाय येत्या सीझनमध्ये आयपीएल मॅचेसची संख्याही वाढवण्यात येणार आहे.आयपीएल २०२४ मध्ये एकूण ७४ सामने होणार आहेत. यानंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ मध्ये ते ८४ सामने आणि नंतर आयपीएल २०२६ पासून ९४ सामने वाढवण्याची बीसीसीआयची योजना आखली आहे.

बहुप्रतिक्षित आयपीएलचा आगामी हंगाम २१ मार्च महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्याधी वूमन्स आयपीएल होईरल. लोकसभा निवडणुकीनंतर आयपीएल २०२४ भारतातच खेळवली जाण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -