Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीAjit Pawar : मोदींसाठी गर्दी झाली म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय!

Ajit Pawar : मोदींसाठी गर्दी झाली म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय!

सोलापूरमधील कार्यक्रमावरुन अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काल सोलापूरमध्ये कामगार वसाहतीच्या (Solapur Labour colony) उद्घाटनासाठी आले होते. ३० हजार कामगारांना या प्रकल्पामुळे काल हक्काची घरे मिळाली. यावेळी भाषणादरम्यान लहानपणीच्या आठवणींनी मोदी भावूक झाले. मात्र, विरोधकांकडून यावरही टीका करण्यात आली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘गर्दी झाली म्हणून म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय’, असा टोला त्यांनी हाणला. ते पुण्यात (Pune) बोलत होते.

अजित पवार म्हणाले, गर्दी झाली म्हणून टीका करतेत व्हय. एवढी प्रचंड गर्दी, काय सांगू तुला. आता माणूस आहे, भावूक होणार. जुने दिवस त्यांना आठवले त्यामुळं ते भावूक झाले. घरं चांगली झालीत. कष्टाळू, गरजूंना घरं मिळाली. पंतप्रधान मोदींच्या हस्तेच भूमिपूजन झालं तेव्हा घरं माझ्या हाताने वितरित होणार, असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. तो शब्द खरा ठरला. विरोधकांच्या पोटात का दुखतंय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, आता तुम्ही जर पत्र्याच्या घरात, छोट्याश्या घरात राहिला असाल, तर तुम्हाला आठवते तशीच त्यांना त्यांची त्यावेळची अवस्था आठवली असेल आणि पंतप्रधान झाल्यावर आपण अनेकांना घरं देतोय हे पाहून ते भावूक झाले असतील. मी पण आधी पत्र्याच्या घरात, सारवलेल्या घरात राहायचो, नंतर बंगला झाला. काळानुरूप परिस्थिती बदलत असते. आता मोदी पंतप्रधान आहेत, मात्र पूर्वीचे दिवस कोणीच विसरत नाही. ते आज त्यांना आठवलं असेल, म्हणून ते भावूक झाले असावेत, असं अजित पवार म्हणाले.

संजय राऊत आणि शरद पवारांनाही लगावले टोले

संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका करताना विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोला अजित पवारांनी लगावला. शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) बोलताना ते म्हणाले, बँकांमध्ये तरुणांना संधी दिली पाहिजे. नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाहीत, असं म्हणत त्यांनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -