Thursday, July 3, 2025

Shaitaan : आर माधवन घेऊन येतोय "शैतान"!

Shaitaan : आर माधवन घेऊन येतोय

आर माधवनने अजय देवगण आणि ज्योतिकासोबत त्याच्या आगामी सुपरनॅचरल थ्रिलरचे पहिले पोस्टर केलं शेअर


मुंबई : आर माधवनने त्याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं असून "शैतान" (Shaitaan) असे या चित्रपटाचे नाव आहे. ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून विकास बहल (सुपर ३० आणि क्वीन) दिग्दर्शित ब्लॅक मॅजिक हॉरर चित्रपटात अजय देवगण, ज्योतिका आणि जानकी बोडीवाला देखील यात आहेत.


चित्रपटाच्या पोस्टरमध्ये वूडू बाहुल्यांची मालिका दर्शविली गेली आहे आणि या वर्षातील सर्वात आकर्षक अलौकिक चित्रपट म्हणून डब केले गेले आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)





आर माधवनचा मागील हॉरर चित्रपट 13B: Fear Has a New Address त्याच्या नवीन खरेदी केलेल्या अपार्टमेंटमध्ये एका माणसाच्या अलौकिक अनुभवांची कथा आहे.


शैतान हे जिओ स्टुडिओज अजय देवगण फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल द्वारे प्रस्तुत केले आहे आणि देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी निर्मीत आहे. शैतान व्यतिरिक्त आर माधवनकडे शशिकांतचे क्रिकेट ड्रामा, ‘टेस्ट’, ‘अधीरष्टसाली’ आणि ‘जीडी नायडू बायोपिक’ हे प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा