मुंबई : महाराष्ट्रातही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली होती.