Saturday, July 20, 2024
HomeदेशHriday Mein Shriram : आर्या आंबेकर, सुरेश वाडकरांच्या आवाजाने सजलेलं रामगीत पंतप्रधान...

Hriday Mein Shriram : आर्या आंबेकर, सुरेश वाडकरांच्या आवाजाने सजलेलं रामगीत पंतप्रधान मोदींनाही भावलं!

गीतकार संदीप – सलीलही झाले भावूक; आर्या म्हणाली, ‘असा पराकोटीचा आनंद…

मुंबई : सध्या संपूर्ण भारतात अयोध्येच्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) होणार्‍या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना (Ram Lalla Pran Pratishtha) सोहळ्याची आतुरता आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम साजरे होत आहेत, तसेच अनेक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. अनेक कलाकार मंडळीदेखील रामाच्या प्रतिकृती, रांगोळ्या साकारत हा जल्लोष साजरा करत आहेत. त्यातच आपल्या मराठी कलाकारांनीही रामावरील एक गीत सादर केलं. ज्याची दखल केवळ मराठी प्रेक्षकांनीच नाही तर देशभरासह चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) घेतली आहे.

संदीप खरे (Sandeep Khare) याने ‘हृदय में श्रीराम’ (Hriday Mein Shriram) हे श्रीरामाला समर्पित गाणं लिहिलं आहे. त्याला सलील कुलकर्णीच्या (Salil Kulkarni) संगीताची जोड मिळाली आहे. तर सुरेश वाडकर (Suresh Wadkar) व आर्या आंबेकर (Arya Ambekar) यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे. या गाण्याला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. तर, दुसरीकडे खुद्द पंतप्रधानांनीही या गाण्याचे कौतुक केले आहे. यामुळे या गाण्याचे गायक व गीतकार भावूक झाले.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत केलं कौतुक

पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत लिहिलं आहे, “अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा संदर्भात संपूर्ण देश भगवान श्रीरामाच्या भक्तीच्या रंगात रंगला आहे. सुरेश वाडेकर आणि आर्या आंबेकर यांनी त्यांच्या मधुर सुरांमध्ये ही भावना व्यक्त केली आहे.” सोबतच मोदींनी ‘हृदय में श्रीराम’ गाण्याची लिंकही शेअर केली आहे.

आर्या आंबेकर भावूक होत म्हणाली…

पंतप्रधान मोदींनी गाण्याची दखल घेतल्याबद्दल आर्या आंबेकर पोस्ट शेअर करत म्हणाली, “जय श्रीराम. ज्यांच्या कार्याने मी प्रभावित होते असे माननीय पंतप्रधान मोदी यांच्या या पोस्टने माझ्या डोळ्यात पाणी आलं. असा पराकोटीचा आनंद कधीच अनुभवला नाही.. हा आनंद फक्त शब्दात मांडता येणार नाही!!! आमचा हा खारीचा वाटा, ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली. प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू पोचला, अशी आमची भावना निर्माण झाली.

प्रिय मोदीजी, २२ जानेवारीला मोठा दिवस साजरा करण्यासाठी आमच्या छोट्याशा योगदानाची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. खरेच, यापेक्षा मोठे कोणतेही प्रोत्साहन असू शकत नाही.

तुमच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा, संगीताच्या माध्यमातून, माझ्या स्वतःच्या मार्गाने देशसेवा करण्याचा सदैव प्रयत्न करेन. मोदीजी, अत्यंत आदराने नतमस्तक होऊन तुमच्या चरणांना स्पर्श करून तुमचा आशिर्वाद घेते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

सलील कुलकर्णीही झाले भावूक

या गाण्याचे संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी भावना व्यक्त करत म्हणाले, “आपल्या गाण्याची माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदीजींनी दखल घेणं आणि कौतुक करणं …..हा खूप खूप समाधानाचा क्षण. जय श्रीराम.”

सुरेश वाडकर म्हणाले…

याशिवाय हे गाणं गाणारे गायक सुरेश वाडकर म्हणाले, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभूश्री राम यांना समर्पित आमचे भजन शेअर केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुमच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राण-प्रतिष्ठा महोत्सवासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. जो प्रत्येकाच्या जीवनातील एक दिव्य, अविस्मरणीय आणि अद्वितीय आणि पवित्र क्षण बनेल. जय जय श्री राम! सियावर रामचंद्र की जय !”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -