Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीBharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो यात्रेच्या मार्गात बदल करणं पडलं...

Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो यात्रेच्या मार्गात बदल करणं पडलं महागात; आसाममध्ये तक्रार दाखल!

‘गांधी कुटुंबच सर्वात भ्रष्ट’ आसामच्या मुख्यमंत्र्यांची टीका

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या (Bharat Jodo Nyay Yatra) विरोधात गुरुवारी आसाम (Assam) पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली नसतानाही यात्रेच्या मार्गात बदल केल्याने पोलिसांनी ही तक्रार दाखल केली आहे. ही यात्रा शहरांच्या मध्यभागातून न काढता त्यासाठी पर्यायी मार्ग वापरा, हट्ट धरण्यात आला तर पोलिसांची फौज देखील तयार असेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र त्याचे पालन न झाल्याने या यात्रेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ही यात्रा आता नागालँडमधून आसाममध्ये पोहचली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसकडून ही यात्रा देशभरात आयोजित केली आहे. मात्र, आसाममध्ये या यात्रेला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे इतर राज्यांतही यात्रा आयोजित करताना काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत.

आसाममध्ये यात्रा रवाना होताच राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, कदाचित देशातलं सर्वात भ्रष्ट सरकार आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री या राज्यात आहे. यावर हिमंता बिस्वा सरमा यांनीही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘गांधी कुटुंबच देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ही राहुल गांधींची ‘न्याय यात्रा’ नसून ‘मियाँ यात्रा’ आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे ते जातात’, अशी टीका त्यांनी केली. ‘मियां’ हा मूलतः आसाममधील बंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -