Friday, June 13, 2025

Naveli Deshmukh : पर्यटन सदिच्छा दूतपदी नवेली देशमुखांची नियुक्ती

Naveli Deshmukh : पर्यटन सदिच्छा दूतपदी नवेली देशमुखांची नियुक्ती

मुंबई : राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता, माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख (Naveli Deshmukh) यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. नवेली देशमुख या राज्यभरात पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.


देशातील बहुतांश राज्यात पर्यटनाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. त्याकरीता अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सहभागी करून पर्यटन क्षेत्रातील विविध स्थळांची प्रसिद्धी करण्यात येत असते. त्याधर्तीवर महाराष्ट्र राज्याची ॲम्बेसेडर ऑफ यूथ टुरिझम म्हणून मिस इंडिया ठरलेली युवा नवेली देशमुख यांची राज्य शासनाने राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

Comments
Add Comment