Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीWomen atrocities : धक्कादायक! धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये अत्याचाराचा प्रयत्न!

Women atrocities : धक्कादायक! धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये अत्याचाराचा प्रयत्न!

मुलीने आरडाओरडा केल्याने टळला अतिप्रसंग

नागपूर : अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या प्रसंगांत हल्ली वाढ झाली आहे. पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या एका चिमुकलीसोबत असचा प्रकार घडला आहे. एसी कोचचा अटेंडंटने धावत्या रेल्वेत मुलीची छेड काढून रेल्वे डब्यातील बाथरूममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांकडून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवारी पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून ९ वर्षांची मुलगी आपल्या आई आणि आजीसोबत प्रवास करत होती. दरम्यान, ९ वर्षीय चिमुकली बाथरूममध्ये गेली असतांना आरोपी देखील जबरदस्तीने आतमध्ये घुसला. बाथरूममध्ये घुसून मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. मुलीची छेड काढत तिला पैशाचे आमिष देण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, मुलीने जोरजोरात आरडाओरड केल्यामुळे सहप्रवाश्यांनी बाथरूमकडे धाव घेतली आणि सर्व प्रकार उघडकीस आला.

रेल्वे डब्यात असलेल्या प्रवाशांनी आरोपीला जोरदार चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वेतील महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. मोहम्मद मुन्नू उर्फ मुन्ना वल्द मोहम्मद (रा. बिहार) असे आरोपीचे नाव आहे. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करत, आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

दरम्यान, मोहम्मद मुन्नू उर्फ मुन्ना वल्द मोहम्मद हा मागील आठ वर्षांपासून रेल्वे विभागात कोच अटेंडन्टचं काम करत आहेत. यापूर्वी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. या प्रकरणात त्याच्यावर भादवि कलम ३५४ सह पोक्सोअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक देखील झाली असल्याची माहिती रेल्वे पोलीस दलाच्या अधिकारी मनीषा काशीद यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -