मुंबई: आजकाल अनेक लोक लठ्ठपणामुळे(obesity) त्रस्त आहेत. अधिक वजन खाण्याच्या पिण्याच्या सवयी आणि खराब लाईफस्टाईलमुळे वाढते. अशातच कॅलरीकडे लक्ष देणे गरजेचे असते. डाएटिंगचा अर्थ केवळ उपाशी राहणे असा नसतो. मात्र त्याऐवजी असे पदार्थ खाल्ले जे हेल्दी असतील. वजन घटवण्यासाठी नाश्त्यामध्ये मखाणा खाणे हा एक चांगला पर्याय आहे. मखाणामध्ये कमी कॅलरीज आणि फायबरचे चांगले प्रमाण असते. यामुळे पोट भरलेले राहते आणि भूकही कमी लागते. सोबतच बेली फॅट कमी करण्यासही मदत होते.
फूड क्रेविंग होते कंट्रोल
मखाणामध्ये असे पोषक तत्व असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. मखाणामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. प्रोटीन पाचन क्रिया धीमी करते आणि दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहते. यामुळे भोजनमधील कालावधी वाढतो. मखाणामध्ये कमी कॅलरीज आणि फॅट असते. यामुळे वजन वाढण्यापासून बचाव होते.
अशा पद्धतीने खा मखाणा
साधे मखाणा– मखाणा चांगला भाजून मीठ आणि काळी मिरी घालून खाऊ शकता.
फ्रुट मखाणा – मखाणामध्ये केळे, सफरचंद, डाळिंब इत्यादी फळे टाकून. तुम्ही हे मिश्रण दुधासोबत खाऊ शकता.
मसालेदार मखाणा – मखाणा तेलावर परतून सैंधव मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि धणे पावडर टाकून स्वादिष्ट बनवू शकता.
चाट मखाणा – मखाणा चाट बनवून नाश्त्यात खाऊ शकता. यात टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची टाका.
मखाणा पराठा – बेसन मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात मखाणा आणि मसाले मिसळून पराठा बनवू शकता.
मखाण्यामध्ये अँटी ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे हळू हळू पचण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिज्म रेग्युलेट होण्यास मदत होते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. यामुळे दररोज नाश्त्यामध्ये मखाणा खाल्ल्याने वजन कमी होते. पोटही संतुष्ट राहते.