Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Rajan Salvi : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ; राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल!

Rajan Salvi : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ; राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल!

आज सकाळीच साळवींच्या घरावर एसीबी टीमने टाकली धाड


रत्नागिरी : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गट (Thackeray Group) अधिकाधिक अडचणीत सापडत चालला आहे. कालच ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आता एसीबीच्या चौकशीनंतर (ACB Inquiry) ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा ११८ टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपपत्रात त्यांच्या पत्नी, मुलगा यांच्या नावाचा देखील नावाचा समावेश आहे. त्यामुळे साळवींना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


आज सकाळी एसीबीच्या टीमने राजन साळवी यांच्या घरावर धाड टाकली. दोन तासांपासून त्यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे. याआधीही एसीबी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी सहावेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. त्यानंतर एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आलं.


एसीबी चौकशीमुळे राजन साळवी यांच्यासाठी निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. साळवी यांची पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे यांची देखील चौकशी करण्यात आली.


त्यानंतर आज सकाळी रत्नागिरीतील त्यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली. सध्या साळवी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपत्तीचे मूल्यांकन केले जात आहे. आरोपपत्रानुसार त्यांनी दाखवलेल्या संपत्तीपेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांच्या घराच्या झाडाझडतीचे काम सुरुच आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसीबी काय कारवाई करते हे पाहावं लागेल.

Comments
Add Comment