Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडाRohit shrma: जे दिग्गजांना जमले नाही ते रोहितने करून दाखवले

Rohit shrma: जे दिग्गजांना जमले नाही ते रोहितने करून दाखवले

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध तिसरा टी-२० सामना जिंकत नवा इतिहास रचला. रोहितने या दरम्यान दिग्गज एमएस धोनीचा रेकॉर्डही मोडीत काढला. भारताने बंगळुरूमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये १० धावांनी हरवले. तसेच अफगाणिस्तानला ३-० असे क्लीन स्वीप केले.

दोन्ही संघादरम्यान पहिल्यांदा टी-२० मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. भारताने यावेळी अफगाणिस्तानविरुद्ध ३-० असे निर्भेळ यश मिळवले. ३६ वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताचा ५४ टी-२०मधील हा ४२वा विजय आहे. रोहित टी-२०मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे. या दरम्यान त्याने कॅप्टन कूल धोनीचाही रेकॉर्ड मोडला. धोनीच्या नेतृत्वात भारताने ७२ सामन्यांपैकी ४१ टी-२० सामने जिंकले होते. मात्र आता हा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर आहे. तिसरा टी-२० सामना अतिशय रोमहर्षक झाला. रोहितने या सामन्यात टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरमधील ५वे शतक ठोकले.

रोहितचे आंतरराष्ट्रीय टी-२० करिअरमधील ५वे शतक

रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. याशिवाय या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. या दरम्यान त्याने विराट कोहलीचा रेकॉर्डही मोडीत काढला. रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार बनला आहे. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची खेळी कऱणारा भारताचा कर्णधार बनला आहे.

सहाव्यांदा टी-२०मध्ये प्लेयर ऑफ द मॅच

रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ६९ बॉलमध्ये नाबाद १२१ धावा केल्या. या दरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले. हिटमॅनला त्याच्या या शानदार खेळीसाठी प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले. टी-२० कर्णधार रोहितने ५५ सामन्यांपैकी सहाव्यांदा हा खिताब मिळवला आहे. तर भारतीय संघाने टी-२०मध्ये ९व्यांदा एखाद्या संघाला क्लीन स्वीप केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -