
मुंबई: भारताने अफगाणिस्तानला १७ जानेवारीला बंगळुरूमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात डबल सुपर ओव्हरच्या थ्रिलर सामन्यात मात दिली. या पद्धतीने भारताने अफगाणिस्तानला ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-० असे क्लीन स्वीप केले.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा निर्णयही शेवटच्या मिनिटात घेण्यात आला. या सुपर ओव्हरसाठी आवेश खान गोलंदाजीसाठी तयार होता. मात्र त्यानंतरही रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेण्यात आला याचा खुलासा झाला आहे.
याबाबत खुद्द बिश्नोईने सांगितले की हा बदल अखेरच्या मिनिटात करण्यात आला होता. बिश्नोईने सामन्यानंतर सांगितले की, आम्हाला दोघांना(आवेश खानलाही) तयार राहण्यास सांगितले होते. मात्र जेव्हा त्यांनी दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आत येताना पाहिले तेव्हा त्यांनी मला लेग बाऊंड्रीसोहत गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यांचा इशारा रोहितच्या दिशेने होता.
बिश्नोईला गोलंदाजी करायला दिल्याने द्रविडने केले रोहितचे कौतुक
टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने प्रेस कॉन्फरन्समध्ये या गोष्टीला दुजोरा की बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा विचार रोहितचा बोता. यासाठी कोणतीही रणनीती बनवण्यात आली नव्हती. शेवटच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आला होता.