नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीलाअयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठेच्या अनुष्ठानसाठी यम-नियमांचे कठोरतेने पालन करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान प्राण प्रतिष्ठेसाठी पाळण्यात येणाऱ्या नियमांचे कठोरपणे पालन करत आहे. यामुळे पंतप्रधान केवळ नारळपाणी पित आहेत आणि जमिनीवर कांबळं टाकून झोपत आहे. यम-नियम अनुष्ठानचा हा आठवा दिवस आहे. पंतप्रधानांनी अन्न खाल्लेले नाही.
यम-नियमाचे पालन करणे अतिशय कठीण मानले जाते. या कठीण नियमांचे पालन करण्यासोबतच पंतप्रधान आपले सरकारी कामही करत आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेशचाही दौरा केला आहे.
खास अनुष्टठान करत आहेत पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी या दिवसांत अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या आधी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान करत आहेत. त्यांनी १२ जानेवारी २०२४ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की अयोध्ये श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी केवळ ११ दिवस शिल्लक आहेत. माझे हे सौभाग्य आहे की मी याचा साक्षीदार बनू शकतो. प्राण प्रतिष्ठेआधी मी आजपासून ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानची सुरूवात करत आहे.
प्राण प्रतिष्ठेच्या समारंभाला मुख्य यजमान असतील पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याचे मुख्य यजमान असणार आहे. याला पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दुजोरा दिला आहे.