
वडोदरा: गुजरातच्या वडोदरा(vadodara) येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे हरणी तलावात एक बोट(boast accident) बुडाली. बोट बुडाल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळच्या शाळेतील २७ विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट न घालताच बसवण्यात आले होते. फायर ब्रिगेडच्या टीम विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, बचावकार्य सुरू
बोट उलटल्याने झालेल्या दुर्घटनेबाबत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने विद्यार्थी बुडाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबातप्रती मी संवेदना व्यक्त करतो. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो. बोटमधून प्रवास करणारे विद्यार्थ आणि शिक्षकांचा शोध घेतला जात आहे.