Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडी

दिल्ली दारू घोटाळा प्रकरण, चौथ्यांदा ED समोर हजर नाही होणार केजरीवाल!

दिल्ली दारू घोटाळा प्रकरण, चौथ्यांदा ED समोर हजर नाही होणार केजरीवाल!

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(CM Arvind kejriwal) दारू घोटाळा प्रकरणी चौथ्यांदा अंमलबजावणी संचलनालयासमोर(ED) हजर राहण्याची शक्यता नाही. ईडीने गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स जारी करताना १८ जानेवारीला सादर होण्यास सांगितले होते. दरम्यान, आज ते गोव्याच्या ३ दिवसीय यात्रेसाठी रवाना होत आहेत.


दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षाशी संबंधित सूत्रांनी बुधवारी सांगितले की ईडीसमोर मुख्यमंत्री केजरीवाल सादर होण्याची शक्यता नाही कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीची माहिती देण्यासाठी त्यांचा तीन दिवसांचा गोव्याचा दौरा नियोजित आहे.



प्रजासत्ताकदिनामुळे गोवा दौऱ्याचा कार्यक्रम लांबणीवर


मुख्यमंत्री केजरीवाल याआधी ११ जानेवारीला दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जाणार होते. मात्र
राष्ट्रीय राजधानीत दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांच्या तयारीमुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला होता.



ईडीचे समन्स अवैध - केजरीवाल


५५ वर्षीय केजरीवाल यांना ईडीने २ नोव्हेंबर, २२ डिसेंबर आणि ३ जानेवारीला समन्स जारी केले होते. दरम्यान, तीनही वेळा ते ईडीसमोर सादर झाले नाहीत. सीएम केजरीवाल यांनी ईडीच्या या समन्सवर सवाल करताना ते अवैध असल्याचे म्हटले होते.


सीएम केरीवाल २ नोव्हेंबरला पहिल्या समन्सच्यावेळेस मध्य प्रदेश दौऱ्यावर निघाले होते. तेथे त्यांनी एक रॅली घेतली होती. तर २२ डिसेंबरला दुसऱ्या समन्सच्या वेळेस मुख्यमंत्री मेडिटेशन रिट्रीटसाठी पंजाबमध्ये होते. तर ३ जानेवारीला मुख्यमंत्री केजरीवाल प्रजासत्ताक दिनाच्या तयारींसह दिल्लीत तीन जागांसाठी चाललेल्या राज्यसभा निवडणुकीचा हवाला देत ईडीसमोर सादर झाले नव्हते.

Comments
Add Comment