Tuesday, May 20, 2025

देशताज्या घडामोडी

BCAS ची मोठी कारवाई, IndiGo वर लावला १.२० कोटींचा दंड

BCAS ची मोठी कारवाई, IndiGo वर लावला १.२० कोटींचा दंड

नवी दिल्ली: मुंबई एअरपोर्टच्या टरमॅक(जमीन)वर प्रवाशांनी जेवण केल्याच्या प्रकरणी विमानन सुरक्षा निगराणी संस्था बीसीएएसरने IndiGoवर तब्बल १.२० कोटींचा दंड ठोठावला आहे. बुधवारी ही माहिती देण्यात आली.


यासोबतच प्रवाशांनी हवाई पट्टीजवळ जेवण करण्याच्या घटनेप्रकरणी बीसीएएसने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडवरही ६० लाखांचा दंड ठोठावला आहे. तर डीजीसीएने या प्रकरणी मुंबई विमानतळ परिचालक एमआयएलवर ३० लाखांचा दंड ठोठावला आहे.


कारणे दाखवा नोटीस केली होती जारी


याआधी बीसीएएसने इंडिगो आणि एआयएएलला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. रविवारी दीर्घकाळाच्या उशिरानंतर जसे इंडिगोचे गोवा-दिल्ली हे विमान मुंबई विमानतळावर उथरले तर अनेक प्रवासी इंडिगो विमानातून बाहेर आले आणि टरमॅकवर बसले. या दरम्यान काही प्रवासी जमिनीवर बसून जेवण करतानाही दिसले.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.






नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोकडून याबाबत नोटीस जाहीर करत इंडिगो आणि एमआयएएल दोन्ही स्थितीचे अनुमान करण्यात आणि विमानतळावर प्रवाशांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास वेळेआधी सक्रिय दिसले नाही. नोटीसमध्ये पुढे म्हटले की इंडिगोने सुरक्षा तपासाचे पालन केल्याशिवाय एअरपोर्टवर प्रवाशांना विमानातून एप्रनवर उतरण्याची परवानगी दिली.

ज्योतिरादित्य सिंधियांनी घेतली होती बैठक


विमानातील प्रवाशांचा विमानतळावर जमिनीवर बसून जेवण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेतली होती.

Comments
Add Comment