Thursday, May 8, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Badlapur Fire News : बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण आग! एकाचा मृत्यू तर चारजण जखमी

Badlapur Fire News : बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण आग! एकाचा मृत्यू तर चारजण जखमी

बदलापूर : बदलापूरच्या (Badlapur) खरवई या भागात असलेल्या व्ही. के. केमिकल कंपनीत (Chemical Company) आज भीषण आग (Fire News) लागली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जे कामगार जखमी अवस्थेत होते त्यांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.


व्ही. के. केमिकल कंपनीत रासायनिक केमिकलवर प्रक्रिया केली जात होती. दरम्यान, आज पहाटे पाचच्या दरम्यान स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनी पेटली. हे स्फोट इतके भयंकर होते की चार ते पाच किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. इतर चार कामगार गंभीर अवस्थेत जखमी झाले आहेत.


या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते. या टेम्पो मधील केमिकल मध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली असं कंपनीतील कामगारांचं म्हणणं आहे. अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मधील अग्निशमन दल ताबडतोब घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले.

Comments
Add Comment