Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीSchool Bus: स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो?

School Bus: स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो?

मुंबई: शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या तसेच सोडणाऱ्या बसेसचा रंग नेहमीच पिवळा पाहायला मिळतो. मात्र तुम्हाला या मागचे कारण माहीत आहे का?

प्रत्येक रंगाचे स्वत:चे असे एक वैशिष्ट्य असते. पिवळा रंग हा लाल रंगाच्या नंतरचा असा रंग आहे जो दूरवरूनही अगदी सहज दिसू शकतो.

लाल रंग आधीपासूनच धोक्याची सूचना देणारा रंग म्हणून वापरला जातो. याच कारणामुळे स्कूलच्या बसचा रंग पिवळा असतो.

पिवळ्या रंगाचे वजन लाल रंगाच्या तुलनेत १.२४ पट अधिक असते. सोबतच पिवळा रंग कोणत्याही मोसमात अगदी सहज दिसतो. पिवळ्या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हा रंग तुमचे लक्ष आकर्षित करतो.

पिवळा रंगाच्या बसेस या केवळ देशभरातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणात आहेत. पिवळा रंग इतर रंगांच्या तुलनेत लवकर नजरेस पडतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -