
रोहित ठरला शतकांचा बादशाह
रोहित शर्माने या सामन्याक शतक ठोकले. त्याने ६४ चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
सामन्यात एक वेळ अशी स्थिती आली होती की भारतीय संघाने अवघ्या २२ धावांमध्ये ४ विकेट गमावल्या ोत्या. यशस्वी ४ धावा करून बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबेला १ धावा तर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला.
यानंतर रोहित शर्माने ६४ बॉलमध्ये शतक ठोकत नवा इतिहास रचला. रिंकू सिंहनेही आपले टी-२० आंतरराष्ट्रीयमधील अर्धशतक ठोकले. त्याने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सामन्यात रोहितने ६९ बॉलमध्ये नाबाद १२१ धावा केल्या. यात त्याने ८ षटकार आणि ११ चौकार लगावले.
टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड
रोहित शर्मा - ५ शतके
सूर्यकुमार यादव - ४ शतके
ग्लेन मॅक्सवेल - ४ शतके
रोहितने मालिकेत खाते खोलले
रोहितने मालिकेत आपले खाते खोलले. पहिल्या दोन सामन्यात त्याला चांगली खेळी करता आली नव्हती. त्याने तिसऱ्या सामन्यात ७व्या बॉलवर आपले खाते खोलले. रोहित पहिल्या दोन सामन्यात खाते न खोलताच परतला होता. रोहितच्या नेतृत्वात जर आज भारतीय संघ हा सामना जिंकत असेल तर भारतीय संघ अफगाणिस्तानल ३-० असा क्लीन स्वीप करेल. याआधीच भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.