Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमीपाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर ईराणचा एअरस्ट्राईक

पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर ईराणचा एअरस्ट्राईक

नवी दिल्ली:इऱाणने पाकिस्तानातील दहशतवादी समूहाच्या ठिकाणांवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला आहे. हा एअरस्ट्राईक बलुचिस्तानच्या पंजगुरमध्ये करण्यात आला. इराणचे म्हणणे आहे की त्यांनी दहशतवादी संघटना जैश इल अदलच्या ठिकाणांवर हल्ला केला. मात्र आतापर्यंत पाकिस्तानकडून या हल्ल्याला दुजोरा देण्यात आलेला नाही तसेच या वृत्ताचे खंडनही करण्यात आलेले नाही.

इराणचे म्हणणे आहे की त्यांनी इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने पाकिस्तानात सुन्नी बलूच दहशतवादी गट जैश अल अदलवर मिसाईल तसेच ड्रोन हल्ले केले. रॉयटर्सच्या माहितीनुसार पाकिस्तानात जैश अल अदलच्या दोन ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की या दहशतवादी गटांनी पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात इराणच्या सुरक्षारक्षकांवर हल्ला केला होता.

इराणने पाकिस्तानात हा हल्ला अशा वेळेस केला जेव्हा इस्त्रायल-हमास संघर्षावर मिडल ईस्टमध्ये तणावाचे वातावरण आहे.

काय आहे जैश उल अदल?

जै अल अदल इराणचा सिस्तान बलुचिस्तान प्रांतातील एक सुन्नी दहशतवादी गट आहे. हा हट पीपल्स रेजिस्टेंस ऑफ इराण या नावानेही ओळखला जातो. याआधी हा गट जुंदअल्लाह होता. मात्र २०१२मध्ये याचे नाव बदलून जैश अल अदल करण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -