
नवी दिल्ली: पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या तळांवर इराणने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगला भडकला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने इराणधील आपल्या राजदूतांना माघारी बोलावले आहे. इतकंच नव्हे तर पाकिस्तानात इराणचे राजदूतही इराणमध्येच आहे. त्यांनाही सांगण्यात आले आहे की इतक्या त्यांना पाकिस्तानात येण्याची गरज नाही.
याआधी मंगळवारी इराणने बलुचिस्तानमध्ये जैश अल अदलच्या दोन तळांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले होते. पाकिस्तानने त्यानंतर या हल्ल्याला दुजोरा देताना दोन मुले मारले गेल्याची तसेच तीन जण जखमी झाल्याचा दावा केला होता.
इराणवर भडकला पाकिस्तान
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी केलेल्या विधानानुसार गेल्या रात्री इराणने पाकिस्तानचा सार्वभौमत्व आणि आतरराष्ट्रीय कायदा मोडत त्यांना उकसवेल अशी कारवाई केली. इराणचे हे बेकायदेशीर पाऊल अजिबात स्वीकारार्य नाही. तसेच हे उचित ठरणार नाही. पाकिस्तानकडेही अशा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.
विधानानुसार, या घटनेवर इराण सरकारला संदेश दिला आहे की पाकिस्तानने इराणमधील आपल्या राजदूतांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानात इराणचे राजदूत सध्या इराणमध्येच आहेत. त्यांना इतक्यात पाकिस्तानात परतू नये असे सांगण्यात आले आहे. आम्ही इराणसोबतचे सर्व उच्चस्तरीय दौरे निलंबित केले आहेत.