Sunday, August 10, 2025

Jioने लाँच केली Republic Day ऑफर, रिचार्जवर मिळणार ३००० रूपयांचे फायदे

Jioने लाँच केली Republic Day ऑफर, रिचार्जवर मिळणार ३००० रूपयांचे फायदे

मुंबई: जिओच्या नव्या रिपब्लिक डे ऑफरची घोषणा झाली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी आपल्या युजर्सला अनेक प्रकारचे फायदे या रिचार्ज प्लानसोबत देत आहे.



मिळणार हे फायदे


या ऑफरअंतर्गत जिओच्या २९९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानवर युजर्सला ३००० रूपयांपेक्षा अधिकचे फायदे मिळतील. याचा फायदा नव्या ग्राहक तसेच जुन्या ग्राहकांनाही मिळणार आहे.



कधीपर्यंत आहे ऑफर


कंपनी या रिचार्ज प्लानमध्ये अनेक कूपन्स ऑफर करत आहे. याचा फायदा शॉपिंग, ट्रॅव्हलिंग आणि दुसऱ्या बिल पेमेंट्समध्ये होऊ शकतो. ही ऑफर ३१ जानेवारीपर्यंत आहे.



काय आहेत फायदे


जिओच्या २९९९ रूपयांच्या प्लानमध्ये कंपनी ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १००चा फायदा देत आहे.


याशिवाय कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेसही देत आहे. दरम्यान, यासोबत तुम्हाला जिओ सिनेमा प्राईमचा अॅक्सेस मिळणार नाही.



स्विगीचे कूपन


रिपब्लिक डेऑफरअंतर्गत तुम्हाला कंपनीकडून २ स्विगी कूपन दिले जात आहे. याचा वापरकरून तुम्ही २९९ च्या बिलवर १२५ रूपयांची सूट मिळवू शकता.



फ्लाईट बुकिंग आणि शॉपिंग कूपन


याशिवाय Ixigoवरून फ्लाईट बुक केल्यास १५०० रूपयांपर्यंत सूट मिळेल. Ajioवरून शॉपिंग केल्यास २४९९ च्या शॉपिंगवर ५०० रूपयांची सूट मिळू शकते.

Comments
Add Comment