
उज्जैन: भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी उज्जैनमध्ये बाबा महाकाल यांचे दर्शन घेतले. ते १५ जानेवारील तडके बाबा महाकाल यांच्या भस्म आरतीत सामील झाले आणि तेथे त्यांनी पूजाअर्चा केली. त्यांनी नंदी हॉलमध्ये बसून बाबांचे ध्यानही केले.
पूजाअर्चासाठी ते नंदी हॉलमध्ये सगळ्यात पुढे बसले होते. नंदी हॉलनंतर महाकाल मंदिर परिसरात उपस्थित इतर देव देवतांचीही त्यांनी पुजा केली. तीनही क्रिकेटर बराच वेळ मंदिर परिसरात होते. यावेळेस पुजारींनी त्यांना बाबा महाकालचे महत्त्वही सांगितले.
#WATCH | Madhya Pradesh | Indian cricketers Tilak Varma, Washington Sundar, Jitesh Sharma & Ravi Bishnoi attend 'Bhasma Aarti' performed at Shree Mahakaleshwar Temple in Ujjain. pic.twitter.com/PGYyiS809h
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) January 14, 2024
सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारीला इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. हा सामना जिंकून भारताने मालिकेवर कब्जा केला. अफगाणिस्तानच्या टीमने भारतासमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने सहज पूर्ण केले. महाकालच्या दर्शनासाठी हे खेळाडू वेळ काढून आले.
अनुष्कासह विराटनेही केला होता अभिषेक
प्रत्येक मोठा खेळाडू आणि सेलिब्रेटी बाबा महाकालच्या दर्शनसाठी उज्जैन येथे जरूर येतो. गेल्या वर्षी मार्चमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मानेही बाबा महाकालचे दर्शन केले होते. दोघांनी बाबा महाकालची भस्म आरती केली होती. पूजा अर्चा केली होती. टीम इंडियाच्या माजी कर्णधार विराटने महाकालेश्वर मंदिरात गर्भ हाबाहेर बसून महाकाल ध्यान केले होते.