Sunday, March 23, 2025
Homeक्रीडाघरच्या मैदानावर टीम इंडियाचे क्रिकेटर आहेत शेर

घरच्या मैदानावर टीम इंडियाचे क्रिकेटर आहेत शेर

मुंबई: भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे कोणासाठीही सोपे नाही. सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. यातील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने या मालिकेत आधीच आघाडी घेतली आहे. असे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा झाले नाही की घरच्या मैदानावर भारताने टी-२० मालिका जिंकली. तर गेल्या १५ मालिकांमध्ये भारताला कोणीही हरवू शकलेले नाही. १५वी मालिका अफगाणिस्तानविरुद्ध सुरू आहे.

टीम इंडियाने घरच्या मैदानावर शेवटची मालिका फेब्रुवारी २०१९मध्ये गमावली होती. ही २ सामन्यांची मालिका होती. ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यांमध्ये भारताला हरवत मोठी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी टी-२० मालिकेनंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही.

जून २०१९ पासून दमदार रेकॉर्ड

टीम इंडियाने जून २०१९ पासून ते आतापर्यंत घरच्या मैदानावर १५ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात त्यांनी १३ मालिका जिंकल्या आहेत तर बाकी २ मालिका अनिर्णित राहिल्या.

जून २०१९ पासून घरच्या मैदानावर टीम इंडिया

मालिका खेळल्या – १५
भारताने जिंकल्या – १३
भारताने गमावल्या – ०
मालिका अनिर्णीत – २

१७ जानेवारीला अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० सामना

अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या तीनन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना १७ जानेवारीला रंगणार आहे. या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकत भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -